Spread the love

गाढोदे येथे २३ ऑगस्टला ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर धम्मप्रवचन

भारतीय बौद्ध महासभेच्या वर्षावास धम्मप्रवचन मालिकेतील सहावे पुष्प; केंद्रीय शिक्षिका ज्योतीताई भालेराव यांचे मार्गदर्शन

जळगाव | प्रतिनिधी

भारतीय बौद्ध महासभा अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, जळगाव जिल्हा (पूर्व) व जळगाव तालुका शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वर्षावास धम्मप्रवचन मालिका २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेतील सहावे पुष्प ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गाढोदे, ता. जळगाव येथे गुंफले जाणार आहे.

या कार्यक्रमात आयु.नी ज्योतीताई भालेराव (केंद्रीय शिक्षिका) या प्रमुख प्रवचनकार म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्ञान, विचार, सामाजिक परिवर्तनातील योगदान तसेच बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारातील त्यांच्या भूमिकेवर यावेळी विचार मांडले जाणार आहेत.

जिल्हा पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
या धम्मप्रवचन कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी तसेच केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, धम्म उपासक व उपासिका उपस्थित राहणार आहेत.

यावेळी रविंद्र एन. वानखेडे (केंद्रीय शिक्षक, जिल्हा उपाध्यक्ष), भीमराव पवार (केंद्रीय शिक्षक, जिल्हा सचिव), बी. एस. पवार गुरुजी (जिल्हा संघटक), सुभाष सपकाळे (जिल्हा संघटक), प्रा. प्रितीलाल पवार (केंद्रीय शिक्षक), जयपाल धुरंधर गुरुजी (बौद्धाचार्य), सुनीताताई वानखेडे (महिला जिल्हा उपाध्यक्ष), विद्याताई झनके (महिला जिल्हा सचिव) आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

धम्मप्रचार व प्रसारासाठी वर्षावास उपक्रम
भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून वर्षावासाच्या कालावधीत धम्मप्रवचन मालिका राबवून भगवान बुद्धांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सामाजिक समतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून गाढोदे येथे हे धम्मप्रवचन आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला जळगाव तालुका शाखेचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, तालुका उपाध्यक्ष (संस्कार) जगदीश सपकाळे, सचिव (संस्कार) किरण सोनवणे, सचिव (संस्कार) शैलेश सोनवणे, तालुका कोषाध्यक्ष यशवंत जाधव, तालुका सरचिटणीस सागर सदावर्ते, महिला तालुका शाखा अध्यक्ष ज्योतीताई दाभाडे, महिला तालुका शाखा सरचिटणीस भारतीताई बिऱ्हाडे आणि महिला तालुका शाखा कोषाध्यक्ष वंदनाताई वानखेडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

धम्मबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
वर्षावास धम्मप्रवचन मालिकेतील या सहाव्या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, जळगाव तालुका व शहर शाखांचे पदाधिकारी, बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका तसेच धम्म उपासक व उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेपूर्वी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, अशी सूचनाही आयोजकांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version