Spread the love

ममुराबाद येथे विलास साठे यांच्या घरी ‘दशमाता भंडारा’; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दशमाता व्रताच्या सांगतेनिमित्त धार्मिक विधी; अबालवृद्धांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

ममुराबाद | प्रतिनिधी

ममुराबाद येथे रहिवासी विलास उखडू साठे यांच्या निवासस्थानी दशमाता व्रताच्या सांगतेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘दशमाता भंडारा’ कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक उपक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत महाप्रसादाचा लाभ घेतला.

दशमाता व्रताच्या सांगतेनिमित्त साठे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दशमाता देवीची विधिवत पूजा, आरती तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी ममुराबाद गावातील अबालवृद्धांसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिभावाने आणि आनंदी वातावरणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल साठे परिवाराचे कौतुक केले.

धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गावातील नागरिक एकत्र येतात. त्यामुळे सामाजिक एकोपा, परस्पर आपुलकी आणि बंधुभाव वाढण्यास मदत होते, अशी भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साठे परिवारासह परिसरातील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे दशमाता भंडारा कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version