Spread the love

टिटवाळ्यात २६ ऑगस्टला ‘खान्देशी कौटुंबिक स्नेहसंमेलन’

खान्देशी बांधवांना एकत्र आणत सामाजिक एकोपा व संस्कृतीच्या जतनाचा उपक्रम; दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

टिटवाळा | प्रतिनिधी :
खान्देश उत्कर्ष सामाजिक संस्था, टिटवाळा यांच्या वतीने **‘खान्देशी कौटुंबिक स्नेहसंमेलन २०२६’**चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत टिटवाळा पूर्व येथील गुरवली रोडवरील, काळू नदीच्या काठी असलेल्या रिव्हर व्ह्यू रिसॉर्ट येथे हे स्नेहसंमेलन होणार आहे.

खान्देशातील बंधू-भगिनी व नागरिकांना एका व्यासपीठावर एकत्र आणणे, परस्पर स्नेह, आपुलकी आणि सामाजिक एकोपा वाढविणे तसेच नव्या पिढीला खान्देशची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांची ओळख करून देणे, हा या स्नेहसंमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या कार्यक्रमाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर ॲड. हर्षली चौधरी थविल, नगरसेविका सौ. उपेक्षा शक्तिवान भोईर, नगरसेवक संतोष आप्पा तरे, बंदेश जाधव, माजी नगरसेवक सुरेश भोईर, शिवसेना शहरप्रमुख किशोरभाई शुक्ला, शिवसेना विभागप्रमुख दादा किस्मतराव, भाजपचे परेशभाई गुजरे, रिजन्सी सर्व फेडरेशनचे अध्यक्ष दीपक भाऊ कांबळे, मनसे उपशहरप्रमुख दिनेश भोयअण्णासाहेब तरे, टिटवाळा महोत्सवाचे अध्यक्ष विजय भाऊ देशकर यांच्यासह पत्रकार राजू टपाल व ननावरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांनी आपल्या प्रेरणादायी उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवून आयोजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयोजनासाठी पदाधिकाऱ्यांचे परिश्रम

स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. प्रवीण वाणी, अध्यक्ष ॲड. विलास भारती, कार्याध्यक्ष विवेक शुक्ल, उपाध्यक्ष राजेंद्र मेखे, सरचिटणीस संजय चौधरी, खजिनदार रविंद्र पिंपळे, पदमसिंह बाविस्कर, अरुण सोनार, दिलीप राठोड, नरेंद्र बाविस्कर, दिगंबर सोनार, दीपक सोनार, मनीषाताई वारडे, शिवव्याख्याता यशोदाताई पाटील, सौ. कल्पनाताई चौधरी व सौ. विजयाताई बडगुजर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

याबाबतची माहिती खान्देश उत्कर्ष सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. विलास भारती यांनी दिली.

खान्देशी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

खान्देशी संस्कृती, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कौटुंबिक स्नेहसंमेलनास खान्देशी समाजबांधवांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version