Spread the love

आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीला नवे बळ

‘आम्ही भारताचे लोक’च्या २१ जिल्ह्यांसह नवी मुंबई समन्वयकांची घोषणा; १० राज्य युवा समन्वयकांचीही नियुक्ती

पुणे प्रतिनिधी | एस. एन. नांदेडकर

‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’, महाराष्ट्र राज्याच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देण्यासाठी २१ जिल्ह्यांसह नवी मुंबईच्या समन्वयकांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यस्तरावर १० युवा समन्वयकांचीही नियुक्ती करण्यात आली असून, या नव्या जबाबदाऱ्यांमुळे चळवळीच्या संघटनात्मक कार्याला अधिक व्यापकता मिळणार आहे.

जिल्हा समन्वयक म्हणून मुंबई – जयेश सोळंकी, पुणे (प्रभारी) – ॲड. नितीन घोडके, पालघर – ॲड. अदिती पवार, ठाणे – गौतम धनावडे, नाशिक – सविता केदारे, अहिल्यानगर – दिनेश गायकवाड, यवतमाळ – संजय पाईकराव, चंद्रपूर – राजपाल जवादे, छत्रपती संभाजीनगर – सुरेश बनसोडे, बुलढाणा – शुद्धोदन गवई, रायगड – शांतेश जाधव, वाशिम (प्रभारी) – डॉ. अविनाश मनवर, नांदेड (प्रभारी) – संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर, सोलापूर – मनोज शिंदे, परभणी – संजय बगाटे, हिंगोली – श्रीनिवास अवचार, बीड – प्रो. डॉ. विठ्ठल जाधव, भंडारा – उमेश बारसागडे, जालना – प्रेमदास खिल्लारे, जळगाव – अजय इंगळे आणि सातारा – राजू मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच नवी मुंबई समन्वयकपदी ज्योती कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दहा युवा समन्वयकांचीही निवड

राज्य युवा समन्वयक म्हणून विनोद गायकवाड, सुरेखा ढोणे, समाधान मस्के, दिप्ती जाधव, रेश्मा सावंत, प्रशांत देठे, सागर भडकुंबे, अमोल रणपिसे, सतीश साखरे आणि राहुल जोगदंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्याचे आवाहन

नवनियुक्त समन्वयकांनी प्रतिनिधी, सदस्य आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने समन्वय साधून संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करावी. तसेच संविधानिक मूल्ये, सामाजिक समता, बंधुता आणि आंबेडकरी विचार समाजाच्या विविध घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

नव्या नियुक्त्यांमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चळवळीचे कार्य अधिक गतिमान होण्यास मदत होणार असून, युवा शक्तीलाही संघटनात्मक कार्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सर्व नवनियुक्त समन्वयकांचे ‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’च्या वतीने अभिनंदन करण्यात आले. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्याच्या मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक यांनी दिली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version