Spread the love

मरीमाता गणेश मंडळाच्या २०२६च्या कार्यकारिणीची घोषणा; शुभम कुटे अध्यक्षपदी

शिवनेरी चौकात गणेशोत्सवाचे १९वे वर्ष; सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्सव अधिक दिमाखदार करण्याचा निर्धार

शिवनेरी चौक | प्रतिनिधी :
शिवनेरी चौक येथील मरीमाता गणेश मंडळाची गणेशोत्सव २०२६ची विशेष बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मंडळाचे यंदा १९वे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव विविध सामाजिक, सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य युवासेना विस्तारक, जिल्हाप्रमुख तथा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कुणाल भाऊ कानकाटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली २०२६ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यावेळी बन्सी काका महाले, गोविंद आप्पा पाखले, अरुण नाना मुसळे, ईश्वर भाऊ चौधरी, हरी काका वाघ, दीपक भाऊ गोरे, रामदास भाऊ कानकाटे, कैलास बापू मराठे, राजू भाऊ ठक्कर, अमोल भाऊ कानकाटे, मनोज भाऊ धात्रक, बाळू भाऊ पाटील, बंडू आप्पा भडांगे, मोहन भाऊ महाले, नितीन भाऊ धात्रक यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनिर्वाचित कार्यकारिणी

  • अध्यक्ष : शुभम भाऊ कुटे

  • उपाध्यक्ष : प्रेम कानकाटे, नैनेश भाऊ ठाकूर

  • खजिनदार : सिद्धांत वाघ

  • स्वागताध्यक्ष : जयेश मुसळे

  • सल्लागार : हरी काका वाघ, नितीन भाऊ धात्रक

  • सहसल्लागार : सतीश भाऊ पाटील, ईश्वर भाऊ चौधरी

  • सचिव : प्रणित पाटील

  • सहसचिव : ओजस भडांगे

  • प्रसिद्धी प्रमुख : संकेत मुर्तडकर, दक्ष प्रजापत

  • आरास विभाग : यश चौधरी, अभिषेक धात्रक

  • निधी संकलन प्रमुख : अमीन शेख, वैभव वाघ, चेतन शिंदे

यंदाचा गणेशोत्सव मंडळाचे १९वे वर्ष असल्याने तो अधिक दिमाखदार आणि समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचा मानस नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्याचे नियोजनही करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version