Spread the love

निशा दंडगुले यांची मनसेच्या शिरूर तालुका सचिवपदी निवड

रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाची जबाबदारी; नियुक्तीपत्र देत पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

पुणे | प्रतिनिधी : एस. एन. नांदेडकर

शिरूर : कु. निशा बालाजी दंडगुले यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाच्या शिरूर तालुका सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे शिरूर तालुक्यातील संघटनात्मक कार्यात तरुणींच्या सहभागाला बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

मनसेचे राज्य उपाध्यक्ष सचिन भांडवलकर आणि पुणे जिल्हाध्यक्ष अविनाश लोखंडे यांच्या हस्ते निशा दंडगुले यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

रस्ते व मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर काम करण्याची संधी

शिरूर तालुक्यातील रस्ते, साधन-सुविधा तसेच आस्थापना विभागाशी संबंधित प्रश्नांवर संघटनात्मक पातळीवर काम करण्याची जबाबदारी दंडगुले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासह संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर राहणार असल्याचे सांगण्यात आले.

युवती सक्षमीकरणाला मिळणार चालना

निशा दंडगुले यांच्या निवडीमुळे युवती सक्षमीकरण आणि महिला नेतृत्वाला प्रोत्साहन मिळणार असून, शिरूर तालुक्यातील संघटनात्मक कार्यात तरुणींचा सहभाग वाढण्यास निश्चितच चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या निवडीबद्दल मित्रपरिवारातूनही निशा दंडगुले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वैष्णवी पाटील, पत्रकार एस. एन. नांदेडकर यांच्यासह अनेक मित्र-मैत्रिणींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याचे दंडगुले यांनी सांगितले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version