Spread the love

दोंडाईचा शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस; सामाजिक सलोखा अन् बंधुभावाचा संदेश

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात मिरवणूक; विविध मान्यवरांकडून स्वागत, पोलिसांचा चोख बंदोबस्त

दोंडाईचा | प्रतिनिधी : सईद खान

दोंडाईचा शहरात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.) यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात पार पडला. मानवतेला शांतता, सत्य, दया, समता आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या पैगंबर साहेबांच्या विचारांचे स्मरण करत मुस्लिम बांधवांनी या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. विविध धर्मीय नागरिकांच्या सहभागामुळे या सोहळ्यात सामाजिक सलोखा आणि एकतेचे सुंदर दर्शन घडले.

नूरानी मशिदीचे मौलाना मुफ्ती हजरत जियाऊद्दीन साहेब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जुलूसचा प्रारंभ करण्यात आला. सकाळी ८.३० वाजता जामा मशिदीपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. भोगावती नदीचा पूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अभिषेक चित्रमंदिर, होळी चौक, आझाद चौक, वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळा, अमरावती नदी, नूरानी मशीद, शहीद अब्दुल हमीद चौक, ईबू बोहरी यांचे दुकान, सेंट्रल बँक व देवरे बिल्डिंगमार्गे जुलूस पुन्हा नूरानी मशीद, अमरावती नदी, गढी परिसर आणि मुन्ना चौकातून जामा मशिदीजवळ पोहोचला. येथे सलातो-सलाम व फातेहा ख्वानीनंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

मान्यवरांकडून जुलूसचे उत्स्फूर्त स्वागत

ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या वतीने मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गढी परिसरात उद्योगपती सरकार साहेब रावल यांच्या वतीने जुलूसवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

तसेच माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बापूसाहेब रवींद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, नगरसेवक रामभाऊ माणिक, नगरपरिषदेचे गटनेते निखिल राजपूत, बांधकाम सभापती बबलू देवरे, नगरसेवक प्रवीण महाजन, जितू गिरासे, विजय मराठे, रवी जाधव, भरतरी ठाकूर, कृष्णा नगराळे, महेंद्र गिरासे, महेंद्र पाटील आणि मनोज धनगर यांच्यासह विविध मान्यवरांनी मिरवणुकीचे स्वागत करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

जुलूस शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन करत चोख बंदोबस्त ठेवला होता. शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, एपीआय संजय बच्छाव, पीएसआय इम्रान खान, पीएसआय नकुल कुमावत, पीएसआय दहिफळे तसेच गोपनीय विभागाचे अविनाश पाटील यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी मिरवणुकीवर विशेष लक्ष ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली.

आयोजकांच्या परिश्रमातून भव्य आयोजन

जुलूसच्या यशस्वी आयोजनासाठी जामा मशिदीचे चेअरमन हाजी सुलतान, नूरानी मशिदीचे समसोद्दीन शेख, हाजी अब्दुल गफ्फार मन्सुरी, हाजी सिराजुद्दीन शेख, धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष नाजीम शेख यांच्यासह असलम बागवान, इक्बाल बागवान, रफिक शाह, फारूक मुनीर, जलील मण्यार, पत्रकार मंजुम पठाण, पत्रकार गुलाब मण्यार, हुसेन पठाण, मोहसीन सिराज शेख, जुबेर शेख, आझम कुरेशी, शाकीर लोहार, रईस शेख, मोहसीन पठाण, पत्रकार वसीम खाटीक, युनूस खान, साबीर शाह, मोहसीन मोमीन, शाहरुख शेख, मोमीन शेख, रऊफ शाह, अली असगर बागवान, आसिफ बागवान, ईरफान बागवान, पत्रकार अख्तर शाह, दगा पेंटर, कालू शाह यांच्यासह मुस्लिम समाजातील युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने प्रेषित पैगंबर साहेबांच्या मानवतावादी शिकवणुकीचे स्मरण करण्यात आले. शांतता, बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मीय एकतेचा संदेश देणारा हा जुलूस दोंडाईचा शहरात उत्साहात आणि शांततेत पार पडला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version