Spread the love

लासूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हा. चेअरमनपदी नौमिन खा पठाण यांची बिनविरोध निवड

नम्रता पॅनलच्या मार्गदर्शनाखाली निवड; संचालक व सभासदांकडून अभिनंदन

चोपडा प्रतिनिधी – राहुल पाटील

लासूर, ता. चोपडा : लासूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेडच्या व्हा. चेअरमनपदी श्री. नौमिन खा इब्राहिम खा पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेदरम्यान सर्व संचालकांनी एकमताने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या नावाला मंजुरी दिली.

गावातील नम्रता पॅनलचे प्रमुख मा. नानासाहेब श्री. ए. के. गंभीर तसेच मा. आप्पासाहेब श्री. अमृतराव दत्तात्रेय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. नौमिन खा पठाण यांच्या निवडीमुळे सोसायटीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास संचालक मंडळ व सभासदांनी व्यक्त केला.

नौमिन खा पठाण यांनी यापूर्वीही सामाजिक तसेच सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

निवडीनंतर नौमिन खा पठाण यांनी सर्व संचालक, सभासद आणि हितचिंतकांचे आभार मानले. सोसायटीच्या सर्वांगीण विकासासोबतच शेतकरी आणि सभासदांच्या हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

संचालक व मान्यवरांची उपस्थिती

यावेळी सोसायटीचे चेअरमन श्री. योगेश दगडू वाघ, सचिव श्री. नारायण शिवराम पाटील, माजी व्हा. चेअरमन श्री. युवराज सीताराम बाविस्कर, माजी चेअरमन श्री. सुरेश उत्तम माळी, माजी व्हा. चेअरमन श्री. अरुण आनंदा देसले, माजी व्हा. चेअरमन श्री. प्रकाश राघो माळी, माजी व्हा. चेअरमन श्री. जगन्नाथ नारायण महाजन, संचालक श्री. महेंद्र नारायण पाटील, श्री. बाळू भिवसान सोनवणे, श्री. संदीप एकनाथ मगरे, श्री. अशोक रामदास बाविस्कर, श्रीमती जिजाबाई दगडू वाघ, श्री. राजेंद्र महादू माळी, तज्ञ संचालक श्री. दिलीप जानकीराम पालिवाल आदी उपस्थित होते.

तसेच गावातील मान्यवर श्री. रमेश नथा पवार, श्री. तुषार दामोधर पाटील, श्री. गोकुळ रतन महाजन, श्री. प्रविण जगन्नाथ मगरे, श्री. जितेंद्र सुरेश महाजन, श्री. दीपक रतन महाजन, श्री. संजय श्रावण राजकुळे, श्री. विजय भागवत कोळी, श्री. नरेंद्र रघुनाथ महाजन, श्री. गोरख सीताराम पाटील, श्री. भरत सोनगीरे सर, श्री. तुषार दगडू वाघ, श्री. शशिकांत भगवान पवार, श्री. साखरलाल एकनाथ माळी, श्री. कैलास साखरलाल महाजन, माजी सरपंच श्री. देविलाल वाघू बाविस्कर, श्री. राजेंद्र कुंभार, श्री. वना पवार, श्री. अशोक नाना मुळीवाले, श्री. रईस खा पठाण, श्री. शरीफ मिस्तरी, श्री. सादिक दादा, श्री. सद्दाम खाटीक, श्री. शाहरुख खाटीक आणि श्री. नूर खा पठाण उपस्थित होते.

सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचित व्हा. चेअरमन नौमिन खा इब्राहिम खा पठाण यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. जितेंद्र सुरेश महाजन यांनी केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version