पाचोरा येथे वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
गोरगरीब, वंचित व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्यालय सदैव तत्पर राहणार; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
पाचोरा प्रतिनिधी : जळगाव लोकसभा मतदारसंघातील पाचोरा तालुक्यात दि. १ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील गोरगरीब, वंचित व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने या कार्यालयाची सुरुवात करण्यात आली.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि आशीर्वादाला केंद्रस्थानी ठेवून जनसेवेच्या उद्देशाने पाचोरा येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मतदारसंघातील नागरिकांना विविध शासकीय योजना, मूलभूत सुविधा तसेच त्यांच्या दैनंदिन अडचणींबाबत मार्गदर्शन व मदत मिळावी, यासाठी कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
वंचितांच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ
वंचित, शोषित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे, त्यांच्या समस्या संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करणे, हा जनसंपर्क कार्यालयाचा प्रमुख उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेने आपल्या समस्या व अडचणी घेऊन कार्यालयाशी संपर्क साधावा. जनतेच्या प्रश्नांसाठी हे कार्यालय सदैव तत्पर राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा महासचिव अमित भाऊ तडवी, जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र सोनवणे सर, जिल्हा उपाध्यक्ष प्रीतीलाल पवार सर, जिल्हा युवक अध्यक्ष जितेंद्र भाऊ केदार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल भाऊ लोंढे, पाचोरा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ जाधव, महासचिव अमोल अहिरे तसेच पाचोरा तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद वाढवून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
