Spread the love

नशिराबाद नगरपरिषदेतर्फे बैलपोळ्यानिमित्त ‘उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धे’चे आयोजन

शेतकरी व बैलमालकांसाठी सुवर्णसंधी; विजेत्यांना रोख रक्कमेसह आकर्षक चषक

नशिराबाद (ता. जळगाव) : शेतकऱ्यांच्या कष्टाचा खरा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच महाराष्ट्राच्या समृद्ध शेतीप्रधान संस्कृती व परंपरेचे जतन करण्याच्या उद्देशाने नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने बैलपोळा सणानिमित्त ‘उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता खालची आळी, विठ्ठल मंदिर, नशिराबाद येथे होणार आहे.

विजेत्यांना रोख बक्षिसांसह चषक

स्पर्धेतील उत्कृष्ट बैलजोड्यांना आकर्षक रोख बक्षिसे व चषक प्रदान करण्यात येणार आहेत.

  • प्रथम क्रमांक : ७,१०० रुपये + चषक
  • द्वितीय क्रमांक : ५,१०० रुपये + चषक
  • तृतीय क्रमांक : ३,१०० रुपये + चषक

नशिराबादमधील बैलमालकांनाच सहभागाची संधी

या स्पर्धेत केवळ नशिराबाद गावातील रहिवाशांनाच सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नशिराबाद नगरपरिषदेमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेची अधिक माहिती व नोंदणीसाठी ९३५९८१७२१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बैलपोळा हा शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करणारा पारंपरिक सण आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच ग्रामीण संस्कृती आणि पारंपरिक मूल्यांचे जतन करण्यासही हातभार लागणार आहे.

‘आपली परंपरा… आपला अभिमान… आपल्या बैलांचा सन्मान!’ या भावनेतून नशिराबाद शहरातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी व बैलमालकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

आयोजक

नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. योगेश पाटील, उपनगराध्यक्ष श्री. पंकज महाजन, मुख्याधिकारी श्री. रविंद्र सोनवणे तसेच सर्व सन्माननीय सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version