स्वरा भास्कर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची करणी सेनेची मागणी
भुसावळ येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; राजपूत समाजाची जाहीर माफी मागण्याची मागणी
भुसावळ : अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी राणी पद्मावती यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या वक्तव्यामुळे राजपूत समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत संबंधित वक्तव्याची दखल घेऊन स्वरा भास्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा तसेच राजपूत समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
यासंदर्भात गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ येथे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भुसावळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राणी पद्मावती यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी करणी सेनेचे पदाधिकारी दामोदर राजपूत, आनंदा राजपूत, संदीप राजपूत, सारिका राजपूत, हर्षल राजपूत, कविता राजपूत, प्रदीप राजपूत, जयश्री राजपूत, नितीन राजपूत, सुरेश राजपूत, मोहिनी राजपूत, सुवर्णा राजपूत, स्मिता राजपूत, प्रियंका राजपूत, श्रद्धा राजपूत, प्रतीक्षा राजपूत, पंकज राजपूत, गोकुळ राजपूत यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
निवेदनाद्वारे संबंधित वक्तव्याबाबत कायदेशीर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि राजपूत समाजाच्या भावना लक्षात घेऊन जाहीर माफी मागण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी करणी सेनेच्या वतीने करण्यात आली.
