न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी
नशिराबाद : प्रतिनिधी
नशिराबाद शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास चौधरी हे उपस्थित होते. तसेच मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष विनायक वाणी, संस्थेचे संचालक जनार्दन माळी आणि ॲड.प्रदीप देशपांडे व मुख्याध्यापक प्रविण महाजन उपस्थित होते. यावेळी शाळेच्या प्रांगणाला गोकुळाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती झाली. यानंतर यानंतर लहान चिमुकल्याने राधाकृष्ण, वासुदेव, देवकी, यशोदा, कालिया नाग आणि बाळ गोपाळांची वेशभूषा सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी कृष्णा वर आधारित नृत्य सादर केले, आणि नर्सरी पासून ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी घागरा ओढणीच्या वेशात उत्तम अशी रासलीला सादर केली. रासलीला दरम्यान कृष्ण सुदामा भेटीचे, कालिया मर्दन चे सादरीकरण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी “गोविंदा आला रे आला” व “कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला” या गीतावर नृत्य सादर केले. तसेच गीता व रासलीला दरम्यान श्रीकृष्णाचा जयजयकार करून कृष्णा व कृष्णाच्या सवंगड्यांनी दही हंडी फोडली व आनंदोत्सव साजरा केला. कृष्णाच्या सर्व सवंगड्यांनी गोकुळातल्या बाळ गोपाळांनी व आमच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, अतिथी गण, पालक रुंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना गोपाळकाल्याचा प्रसाद वाटला.
या कार्यक्रमास बाल कृष्णाच्या भूमिकेत नमन बोंडे, विदीप सपकाळे, स्वप्निल बाविस्कर, राधाच्या भूमिकेत फाल्गुनी कोल्हे, यशस्वी मराठे, देवकीच्या भूमिकेत देवांशी सपकाळे, वासुदेवाच्या भूमिकेत कृष्णा वाणी, यशोदेच्या भूमिकेत स्वरा अत्तरदे, कालिया नागाच्या वेशात स्वराज भावसार, सुदामाच्या वेशात रुद्र चौधरी यांनी साकारली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन वैशाली पाचपांडे, भावना भावसार, सुनिता शिवरामे, मनीषा घोडकर आणि स्वाती चौधरी यांनी केले. त्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण महाजन सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार सुनिता शिवरामे मॅडम यांनी मानले.
