Spread the love

मुंबई : आयपीएल स्पर्धा सुरू झाली की गेल्या चार पाच वर्षांपासून एकच चर्चा असते. महेंद्रसिंह धोनीचं यंदा शेवटचं पर्व असणार आहे. पण महेंद्रसिंह धोनी मात्र आयपीएल स्पर्धा खेळतच आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात सुरूवातीला होणाऱ्या चर्चा नंतर केराच्या टोपलीत जातात. असं असताना यंदाही महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत वावड्या उठल्या आहे. महेंद्रसिंह धोनी यंदा शेवटची आयपीएल स्पर्धा खेळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण खरंच महेंद्रसिंह धोनी निवृत्त होणार आहे का? त्याचं उत्तर खुद्द महेंद्रसिंह धोनी एका कार्यक्रमात दिलं. चेन्नई सुपर किंग्साच एक कार्यक्रम 22 मार्च 2026 रोजी पार पडला. या कार्यक्रमात निवृत्तिबाबतचा प्रश्न थेट महेंद्रसिंह धोनीला विचारला गेला. तेव्हा त्याने त्याचं उत्तर हसतच दिलं. धोनीने यावेळी थेट काही सांगितलं नाही, पण फिटनेसबाबात सांगत या प्रश्नाचं उत्तर दिलं.

महेंद्रसिंह धोनी सध्या 44 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याचं फिटनेस आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. धोनीने आयपीएल स्पर्धेतील निवृत्तिबाबतच्या प्रश्नावर सांगितलं की, फिटनेसची पातळी कधी वर, तर कधी खाली जात आहे. अशा स्थितीत कठीण आहे. पण खेळण्याचा प्रयत्न वारंवार सुरू आहे. जितकं चांगलं देता येईल तितकं चांगलं देण्याचा प्रयत्न आहे. महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा निवृत्तीच्या प्रश्नावर थेट काही उत्तर दिलं नाही. त्यामुळे यंदाचं पर्व शेवटचं आहे की नाही हे सांगता येणं कठीण आहे. पण वय आणि फिटनेसचं कारण सांगत निवृत्तीची वेळ जवळ येत असल्याचे संकेत मात्र दिले आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी इम्पॅक्ट प्लेयर म्हणूनच उतरण्याची शक्यता आहे. तसेच विकेटमागून खेळाडूंना मार्गदर्शन करून शकतो. मागच्या पर्वात ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याने महेंद्रसिंह धोनीने धुरा सांभाळली होती. मात्र हवी तशी कामगिरी संघाकडून झाली नाही. आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला. तसेच 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. त्यामुळे 8 गुण आणि -0.647 नेट रनरेटसह शेवटच्या स्थानी समाधान मानावं लागलं.

Share.
Leave A Reply

Exit mobile version