न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिर नशिराबाद येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
नशिराबाद | प्रतिनिधी :-
नशिराबाद शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रविण महाजन उपस्थित होते तर मंचावर विद्यार्थी मुख्याध्यापक गितेश चव्हाण , विद्यार्थी उप मुख्याध्यापक मॄणाल चौधरी , पर्यवेक्षक तन्वी माळी आणि विद्यालयाचे उपशिक्षका मंगला चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत वर्गावर अध्यापन केले. विद्यार्थीच शिक्षक बनल्याने शाळेत एक वेगळाच उत्साह दिसून आला. इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच स्वरा अत्तरदे, देवेंद्र भोई, त्रिशा माळी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे सादर केले. विद्यालयाच्या उपशिक्षिका मंगला पिंगळे यांनी आपल्या मनोगतात शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करत, गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची ओळख असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान राखावा असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमानंतर संस्थेचे कार्याध्यक्ष व नशिराबाद नगरीचे नगराध्यक्ष योगेश पाटील, जेष्ठ संचालक जनार्दन माळी, ॲड प्रदीप देशपांडे व माध्यमिक उपशिक्षक जे वाय महाजन यांनी शिक्षकदिन निमित्त सर्व शिक्षक व शिक्षकेक्तर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे नियोजन वंदना पाटील, नंदिनी सुर्यवंशी, वर्षा नारखेडे व मंगला पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक हर्षिता घोडकर व पायल पाटील तर आभार प्रदर्शन प्रेक्षिता खाचणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
