छत्रपती संभाजीनगर मध्यच्या शहराध्यक्षपदी जीशान देशमुख; कार्याध्यक्षपदी मुसेफ कुरेशी!
एमआयएमची २९ जणांची नवीन दमदार टीम जाहीर; पक्ष संघटन मजबूत करण्यासह जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : जॉन भालेराव
छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएमने संघटनात्मक बांधणीला वेग देत नवीन शहर कार्यकारिणीची घोषणा केली आहे. हज हाऊसच्या सभागृहात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांनी जंबो शहर कार्यकारिणी जाहीर केली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नवीन कार्यकारिणीत एकूण २९ पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी या टीमवर सोपविण्यात आली आहे.
जीशान देशमुख यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी
छत्रपती संभाजीनगर मध्यच्या शहराध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले युवा नेते जीशान मुकीम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
तर मुसेफ कुरेशी यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांसह नव्याने नियुक्त करण्यात आलेली २९ जणांची टीम पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी काम करणार आहे.
जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्षाची बूथपासून शहर पातळीपर्यंत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासोबतच **जनतेच्या स्थानिक प्रश्नांना वाचा
