Spread the love

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये गोपिकांनी फोडली दहीहंडी!

श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांनी रचले चार थर, गोपिकांच्या विजयानंतर जल्लोष

पाळधी : प्रतिनिधी

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करत जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधेची आकर्षक वेशभूषा करून कार्यक्रमात सहभाग घेत उपस्थितांची मने जिंकली.

चार थरांची मानवी मनोरा; विद्यार्थ्यांचा थरार

जन्माष्टमीच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात विशेष दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी उत्साहाने एकावर एक असे चार थर रचत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. या थरारक क्षणांना उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. विद्यार्थ्यांच्या साहसाचे तसेच सांघिक प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले.

अखेर गोपिकांनी मारली बाजी!

विद्यार्थ्यांच्या प्रयत्नानंतर अखेरीस शाळेच्या **गोपिकांनी दहीहंडी फोड

Share.
Leave A Reply

Exit mobile version