Spread the love

नशिराबादच्या सहा सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार

उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा आदेश; एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याच्या महसुली हद्दीत प्रवेशबंदी

जळगाव : नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सहा सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव विभाग यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित सहा जणांना एक वर्षासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.

सहा जणांवर कारवाई

हद्दपार करण्यात आलेले सर्व इसम नशिराबाद, ता. जि. जळगाव येथील रहिवासी असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत—

  • अताउल्ला उर्फ मायाबाई अमानुल्ला शहा
  • मुकतार शहा खलील शहा
  • अक्रम शहा सादिक शहा
  • रोहित दिलीप नाथ
  • विपुल गोविंदा नाथ
  • आवेश उर्फ काल्या शेख जहांगीर

या इसमांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. परिसरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नशिराबाद पोलिसांकडून हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी संबंधित सहा जणांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.

आदेश मोडल्यास अटकेचा इशारा

हद्दपारीच्या कालावधीत संबंधितांनी सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी न घेता जळगाव जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यास त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांना अटक करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

API योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुणवंत देशमुख, चंद्रकांत पाटील, तसेच पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर आणि पंकज सोनवणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version