‘साकेत अयोध्या नगरीचा खरा इतिहास’ विषयावर प्रभावी प्रवचन
प्रियंका ताई अहिरे यांनी साध्या-सोप्या भाषेत मांडला इतिहास; वर्षावास प्रवचन मालिकेच्या नवव्या पुष्पाची भक्तिमय सांगता
जळगाव : वर्षावास प्रवचन मालिकेअंतर्गत ६ सप्टेंबर २०२६ रोजी ‘साकेत अयोध्या नगरीचा खरा इतिहास’ या विषयावर विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. जळगाव जिल्हा अध्यक्ष आयु. नी. प्रियंका ताई अहिरे यांनी उपस्थितांना या विषयाची माहिती साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितली.
प्रियंका ताई अहिरे यांनी साकेत नगरी व अयोध्येच्या इतिहासाशी संबंधित विविध पैलूंवर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीतील प्रवचनाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रवचनाने वर्षावास प्रवचन मालिकेतील नवव्या पुष्पाची सुरेल गुंफण झाली.
पुण्यानुमोदनानिमित्त खीरदान व बाबासाहेबांचा फोटो विहाराला भेट
यानंतर दिवंगत राजू लक्ष्मण गायकवाड यांच्या पुण्यानुमोदनानिमित्त त्यांच्या कन्या सोनाली गायकवाड यांनी खीरदान केले. तसेच परमपूज्य बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो विहाराला दान करून वडिलांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.
यावेळी आयु. नी. प्रतिभाताई शिरसाठे (शहर संघटक), आयु. नी. शोभाताई घायतडक (शहर संघटक), आयु. नी. सुजाताताई जंजाळे (शहर संघटक), आयु. नी. मायाताई निकम, आयु. नी. सीमा ताई बावस्कर, आयुष्यमानी शिल्पाताई गायकवाड, आयु. नी. वैशालीताई जंजाळे, आयु. नी. वंदनाताई शेजवळ, आयु. मा. कल्पनाताई मोटे, आयु. मा. लोखंडे ताई, आयु. मा. भालेराव ताई यांच्यासह असंख्य उपासिका व लहान बालक-बालिका उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे विहार परिसरात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
नमो बुद्धाय!
जय भीम!
