Spread the love

वरणगाव फॅक्टरीत राजपूत समाजाचा गुणगौरव सोहळा उत्साहात

गुणवंत विद्यार्थ्यांसह सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त समाजबांधवांचा सत्कार; शिक्षण, संस्कार व सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित

भुसावळ (प्रतिनिधी) : ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव येथील कम्युनिटी हॉलमध्ये राजपूत समाज उन्नती मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सामाजिक सेवा करणाऱ्या व्यक्तींचा तसेच निवृत्त समाजबांधवांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह राजपूत होते. यावेळी समाधान महाजन, जिल्हाप्रमुख शिवसेना, नरेंद्रसिंग पाटील, नगरसेवक मनपा जळगाव, तृप्ताताई महाजन, नगरसेविका वरणगाव, प्रा. सौ. संगीता पाटील, चाळीसगाव, प्रा. कल्पना पाटील, प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. काजल पाटील, पाचोरा, विलाससिंग पाटील, तालुकाप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस, भुसावळ यांच्यासह श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश संघटक विलाससिंह पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष दामोदर राजपूत, भगवानसिंह खंडाळकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंग मोरे, संदीपसिंग राणा, सारिकाताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला अभिवादन

कार्यक्रमाच्या प्रारंभी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

शिक्षणासोबत संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची गरज

प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. काजल पाटील यांनी मार्गदर्शन करताना शिक्षणासोबत संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि उच्च शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात प्रवीणसिंह राजपूत यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा त्यांच्या मेहनतीला समाजाकडून मिळालेली प्रेरणा असल्याचे सांगितले. समाजाच्या प्रगतीसाठी युवकांनी पुढे येऊन संघटित होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पदाधिकाऱ्यांसह समाजबांधवांचे परिश्रम

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंकज जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सत्यपालसिंग राजपूत यांनी केले, तर आभारप्रदर्शन सुनील पाटील सर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष सी. एल. पाटील, सचिव प्रवीण पाटील, स्वप्नील राजपूत, सौ. वैशाली पाटील, बाबुलाल पाटील, चंचलसिंग राजपूत, स्वप्नील सोळंके, पवन पाटील यांच्यासह समाजबांधव व महिलांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version