Spread the love

मनमाडमध्ये संविधान आर्मीचा राज्यव्यापी मेळावा

१३ सप्टेंबरला मेळावा, राज्यव्यापी बैठक व प्रवेश सोहळा; राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांचे आगमन

मनमाड (प्रतिनिधी) : ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने मनमाड येथे राज्यव्यापी मेळावा, राज्यव्यापी बैठक आणि प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक जगन भाई सोनवणे यांचे मनमाड येथे आगमन होणार आहे.

येत्या १३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता हा कार्यक्रम होणार असून, या पार्श्वभूमीवर सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच अधिकारी वर्गाला निमंत्रणे देण्याचे काम सुरू आहे.

नगराध्यक्षांसह विविध मान्यवरांना निमंत्रण

ऑल इंडिया संविधान आर्मीचे जिल्हा महामंत्री वाल्मिकी नेते मटरुलाल भाई चुनियान यांनी मनमाडचे नगराध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट) नेते योगेश भाऊ उर्फ बबलू भाई पाटील, मनमाड नगरपालिका मुख्याधिकारी श्री. चौधरी, तसेच मनमाडमधील नेते राजाभाऊ अहिरे यांच्यासह विविध मान्यवरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.

याशिवाय संविधान आर्मी महिला आघाडीच्या नाशिक लोकसभा जिल्हाध्यक्षा वंदनाताई काळे, दिंडोरी-नाशिक लोकसभा जिल्हाध्यक्षा सुनीताताई महिरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कांचनराव जाधव, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार मणियार साहेब, नाशिक जिल्हाध्यक्ष शशिकांत भाई शार्दुल, परदेश सल्लागार प्रा. किशोर जाधव, महिला आघाडीच्या महामंत्री मायाताई काळे, OBC सेलचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सानप साहेब, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक उगले आणि युवा नेते दीपक भाई शिरसाट यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवरांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

आमदार सुहास कांदे यांच्यासोबत बैठक

दरम्यान, मनमाड-नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना (शिंदे गट) नेते सुहास अण्णा कांदे यांनी ८ सप्टेंबर रोजी मनमाड व नांदगाव येथील संविधान आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बैठक व चर्चेसाठी बोलाविले आहे.

या बैठकीत राज्यव्यापी मेळाव्याबाबत चर्चा होणार असून, आमदार सुहास कांदे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

कार्यक्रमासाठी पदाधिकाऱ्यांची तयारी

राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यात राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे. मेळाव्यासोबतच नवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा आणि राज्यव्यापी बैठक होणार असल्याने संविधान आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version