सोयगाव पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न
आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन; पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
सोयगाव (प्रतिनिधी) : सोयगाव पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. आगामी काळातील सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी API गोरे, API आरेकर तसेच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना विविध बाबींवर मार्गदर्शन केले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
बैठकीस सोयगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास दादा काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (RPI) शहराध्यक्ष रवींद्र भाऊ काळे, तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील, नगरसेवक संतोष बोडखे, नगरसेवक हर्षल (बंटी) काळे, मराठा मोर्चा समन्वयक विजय दादा काळे तसेच कृषीभूषण अरुण दादा सोहनी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शांतता व सलोखा राखण्यावर भर
बैठकीत आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांमध्ये परस्पर सलोखा कायम ठेवणे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.
प्रशासन, पोलीस आणि नागरिकांनी परस्पर समन्वयातून शांतता व सुव्यवस्था कायम राखावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
