Spread the love

नाहाटा महाविद्यालयात ललित कला स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

रांगोळी, मेहंदी, पोस्टर मेकिंगसह विविध कलाप्रकारांत विद्यार्थ्यांचा सहभाग; सामाजिक आणि समकालीन विषयांना कलात्मक अभिव्यक्ती

भुसावळ | प्रतिनिधी : भुसावळ येथील कला, विज्ञान व पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी ललित कला स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच विविध सामाजिक व समकालीन विषयांकडे कलात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळावी, या उद्देशाने विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दीपक पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी, कार्यालय प्रबंधक श्री. भगवान तायडे आणि कला मंडळ प्रमुख डॉ. प्रफुल्ल इंगोले उपस्थित होते.

विविध कलाप्रकारांत विद्यार्थ्यांची सर्जनशीलता

ललित कला स्पर्धांमध्ये रांगोळी, मेहंदी, व्यंगचित्र, कोलाज, इन्स्टॉलेशन, फोटोग्राफी, स्पॉट पेंटिंग, पोस्टर मेकिंग आणि क्ले मॉडेलिंग अशा विविध स्पर्धांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांना महिला सबलीकरण, स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया, जेन झी, भारतीय संस्कृती व सण-उत्सव, सोशल मीडियाचे फायदे व तोटे, वन्यजीव संरक्षण, माझ्या स्वप्नातील भारत, पर्यावरणीय बदल, मोबाईलच्या आहारी गेलेली तरुणाई, महागाई, भ्रष्टाचार, राजकारण तसेच AI आणि मानवी जीवन आदी विषय देण्यात आले होते.

या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि सर्जनशीलतेचा प्रभावी आविष्कार घडवून आणला. स्पर्धेत एकूण ९९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

शिक्षकांचे मोलाचे सहकार्य

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. वंदना महाजन, डॉ. विद्या पाटील, प्रा. नयना चौधरी, डॉ. दिनानाथ पाठक, डॉ. सचिन राजपूत, प्रा. प्रणिता राणे, प्रा. सपना जंगले, डॉ. एस. के. राठोड, प्रा. नेहा महाजन, प्रा. गौतम भालेराव, डॉ. कविता पांडव, डॉ. प्रियंका महाजन, डॉ. जितेंद्र आडोकार, प्रा. ज्ञानेश्वर जावळे, प्रा. सुनील अडकमोल आणि डॉ. शलाका निकम आदींनी सहकार्य केले.

परीक्षकांनी केले कलाकृतींचे परीक्षण

स्पर्धांचे परीक्षण डॉ. रश्मी शर्मा, डॉ. गौरी पाटील, डॉ. स्मिता चौधरी, डॉ. ममता पाटील, डॉ. उमेश फेगडे, डॉ. विलास महिरे, डॉ. हर्षल पाटील, डॉ. एस. टी. धूम, डॉ. मनोज पाटील, डॉ. किरण वारके, डॉ. सचिन येवले, डॉ. दीपक पाटील आणि डॉ. मनोज जाधव आदींनी केले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कला आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्न तसेच आधुनिक जीवनातील विविध पैलू प्रभावीपणे मांडले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version