Spread the love

श्री कालभैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून नाडगाव येथे दर्शन

नाडगावात भक्तिमय वातावरणात यात्रोत्सव; शेतकरी बांधवांच्या सुख-समृद्धीसाठी केली मनोभावे प्रार्थना

बोदवड प्रतिनिधी : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील नाडगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री कालभैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यात्रोत्सवानिमित्त मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी श्री कालभैरवनाथ महाराजांचे मनोभावे दर्शन घेत विधिवत पूजन केले.

यावेळी मंदिरात धार्मिक विधी पार पाडत नाडगाव परिसरातील नागरिक, शेतकरी बांधव आणि भाविकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच यात्रेच्या पारंपरिक परंपरेनुसार बैलपोळा पूजन करण्यात आले. शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी आणि भरभराट नांदो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

यात्रोत्सवानिमित्त नाडगाव परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. मंदिराची आकर्षक सजावट, भाविकांची मोठी गर्दी तसेच विविध धार्मिक आणि पारंपरिक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

याप्रसंगी शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री कालभैरवनाथ महाराजांच्या कृपेने नाडगावसह संपूर्ण मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट नांदो, अशी मनःपूर्वक प्रार्थना करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version