Spread the love

धरणगाव उपनगराध्यक्षपदी रूपाली महाजन यांची बिनविरोध निवड

शिवसेनेच्या रूपालीताई पवन महाजन देवरे यांच्यावर उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

धरणगाव | प्रतिनिधी : धरणगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी रूपालीताई पवन महाजन देवरे यांची दि. ११ सप्टेंबर रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे शिवसेना तसेच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रूपाली महाजन या धरणगाव येथील शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष, श्री व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक तसेच माळी समाजाचे पदाधिकारी देविदास बापू महाजन यांच्या सुनबाई असून, उद्योगपती पवन भाऊ महाजन यांच्या पत्नी आहेत.

उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी रूपाली महाजन यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, जळगाव जिल्हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे नेते भानुदास विसावे, शिवसेनेचे युवा नेते प्रतापराव पाटील, मोठा माळीवाडा समाजाचे संचालक विजय भाऊ महाजन, माजी गटनेते पप्पू भाऊ भावे, नगरपालिकेचे गटनेते विलास भाऊ महाजन, धरणगाव शहर शिवसेना शहरप्रमुख धीरेन आप्पा पूर्भे यांच्यासह शिवसेना, युवासेना, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गायकवाड साहेब, मुख्याधिकारी रोशन कुमार राजपूत तसेच कार्यालयीन अधिकारी भिकन पारधी साहेब उपस्थित होते. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपस्थित मान्यवर व अधिकाऱ्यांनी नवनियुक्त उपनगराध्यक्ष रूपाली महाजन यांचे स्वागत व सत्कार करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

शहराच्या विकासासाठी मिळालेली ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version