दापोरेत भक्तीचा जागर! २८ वा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचा भव्य सोहळा
‘एक गाव, एक गणपती’च्या संकल्पनेतून १६ ते २४ सप्टेंबरदरम्यान धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; नामस्मरण, हरिपाठ आणि कीर्तनाने दापोरे नगरी होणार भक्तिमय
शैलेश गुरव | जळगाव ग्रामीण प्रतिनिधी
जळगाव (दापोरे) : जळगाव तालुक्यातील दापोरे येथे श्री जय गणराया बहुउद्देशीय मित्र मंडळाच्या वतीने २८ व्या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक गाव, एक गणपती’ या भक्तिमय तसेच सामाजिक एकतेच्या संकल्पनेला पुढे नेत दि. १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाच्या कालावधीत दररोज सकाळी गणपती महाराजांची महाआरती, सायंकाळी ५ ते ६ वाजता हरिपाठ, तर रात्री ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत हरिकीर्तन होणार आहे. संतवाणी, नामस्मरण आणि कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्मिक विचारांचा जागर करण्यात
