Spread the love

धुळ्यात भगवान वराह जयंती उत्साहात साजरी

श्रीराम सेना फाउंडेशनचा उपक्रम; प्रकाश टॉकीज चौकात विधिवत पूजन, घराघरात जयंती साजरी करण्याचे आवाहन

धुळे | प्रतिनिधी :

भगवान विष्णूंचा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान वराह यांची जयंती धुळे शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. श्रीराम सेना फाउंडेशनच्या वतीने पारोळा रोड परिसरातील प्रकाश टॉकीज चौकात भगवान वराह यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हिंदू धर्मपरंपरेत भगवान वराह अवताराला विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण करून पृथ्वीचे रक्षण केल्याची धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या जयंतीनिमित्त हिंदू बांधवांनी आपल्या घराघरात भगवान वराह जयंती साजरी करून धार्मिक परंपरा आणि संस्कृतीचे जतन करावे, असे आवाहन श्रीराम सेना फाउंडेशनचे संस्थापक विकी गोयर यांनी केले.

प्रकाश टॉकीज चौकात आयोजित कार्यक्रमात भगवान वराह यांचे पूजन व आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी धार्मिक वातावरणात जयंती उत्साहाने साजरी केली. परिसरातील नागरिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

याप्रसंगी श्रीराम सेना फाउंडेशनचे संस्थापक विकी गोयर, सामाजिक कार्यकर्ते सागर परदेशी, बापू बागुल, मयूर कुलकर्णी, अविनाश गोयर, काशिनाथ पिंगळे, लोकेश गोयर, कृष्णा अहिरे, रोहित बागुल यांच्यासह शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

भगवान वराह अवताराचे धार्मिक महत्त्व
हिंदू धार्मिक परंपरेनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी वराह अवतार धारण केला. त्यामुळे भगवान वराह यांना भगवान विष्णूंच्या प्रमुख अवतारांपैकी एक मानले जाते. वराह जयंतीच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धा, संस्कृती आणि परंपरांचे स्मरण केले जाते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version