Spread the love

भडगाव तालुका ग्रामीण कारागीर ग्रामोद्योग संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

सभासदांची मोठी उपस्थिती; डिजिटल कामकाजासाठी ऑनलाइन सॉफ्टवेअर खरेदीचा महत्त्वपूर्ण निर्णय

भडगाव | प्रतिनिधी गणेश रावळ : भडगाव तालुका ग्रामीण उद्योग कारागिरांची वि. का. सहकारी ग्रामोद्योग संस्था मर्यादित, भडगाव (जि. जळगाव) या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

चाळीसगाव रोडवरील ‘विश्वकर्मा प्लायवूड’ येथे संस्थेचे चेअरमन सुनील मोहन मिस्तरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. अजेंड्यावरील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

वार्षिक अहवाल व ताळेबंद मंजूर

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, वार्षिक तेरीज, नफा-तोटा पत्रक तसेच ताळेबंद पत्रक सभेसमोर सादर करण्यात आले. त्यावर चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक मंजूर

मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. तसेच सन २०२६-२७ या आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सभेसमोर सादर करून त्यास मंजुरी देण्यात आली.

संस्थेचे कामकाज होणार डिजिटल

संस्थेचे दैनंदिन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने ऑनलाइन कॉम्प्युटर सॉफ्टवेअर खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सभेत घेण्यात आला.

यावेळी खैरनार साहेब यांनी ऑनलाइन सॉफ्टवेअरच्या कार्यपद्धतीविषयी सभासदांना सविस्तर माहिती दिली. डिजिटल प्रणालीमुळे संस्थेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

थकबाकी कर्ज वसुलीसह नवीन सभासदांबाबत चर्चा

संस्थेकडील थकबाकी कर्जाच्या वसुलीबाबत कायदेशीर बाबींवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. तसेच संस्थेच्या कार्यक्षेत्रातील नवीन सभासदांना संस्थेत सामावून घेण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

याशिवाय वार्षिक ऑडिट मेमो आणि ऑडिटर यांच्या नियुक्तीस सभेत मंजुरी देण्यात आली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version