Spread the love

आमदार दहीहंडीच्या Reels स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

युवकांच्या डिजिटल सर्जनशीलतेला मिळाले व्यासपीठ; अक्षय पायघन प्रथम, हर्ष राजपूत द्वितीय तर शिव सोनार तृतीय

पारोळा : संदीप पाटील

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वानिमित्त एरंडोल विधानसभा मतदारसंघातील ‘आमदार दहीहंडी’ सोहळ्याच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या Reels Competition ला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.

आमदार दहीहंडी सोहळ्याचे भव्य स्वरूप, जल्लोष आणि अविस्मरणीय क्षण Reelsच्या माध्यमातून सादर करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेला डिजिटल माध्यमातून सादर केले.

स्पर्धेतील Reelsचे परीक्षण करताना व्हिडिओची गुणवत्ता, प्रभावी मांडणी, एडिटिंग, क्रिएटिव्हिटी, कॅमेरा अँगल, ट्रान्झिशन आणि फ्रेमिंग यांसह Instagramवरील Likes, Comments, Shares आणि Reach या निकषांचाही विचार करण्यात आला.

अक्षय पायघन प्रथम

स्पर्धेत शेंदुर्णी, ता. जामनेर येथील अक्षय पायघन याने प्रथम क्रमांक पटकावला. पारोळा येथील हर्ष राजपूत याने द्वितीय, तर एरंडोल येथील शिव सोनार याने तृतीय क्रमांक मिळविला.

प्रथम क्रमांकासाठी ₹११,१११ चे बक्षीस श्री. कोमल हिम्मतराव पाटील (श्री बालाजी स्वयंसेवक, पारोळा), द्वितीय क्रमांकासाठी ₹७,००० चे बक्षीस श्री. मयूर सुकलाल भोई (तालुकाध्यक्ष, भोई समाज युवा मंच, पारोळा) आणि तृतीय क्रमांकासाठी ₹५,५५५ चे बक्षीस दादासो. साहेबराव विनायक पाटील (संचालक, शेतकी संघ, पारोळा) यांनी आयोजित केले होते.

विजेत्या स्पर्धकांना आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

आयोजकांचाही सत्कार

स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेणारे सिद्धांत मोरे आणि विक्की चौधरी यांचा यावेळी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या उपक्रमामुळे युवकांना त्यांच्या कलागुणांसह डिजिटल सर्जनशीलता, व्हिडिओ निर्मिती आणि सोशल मीडिया कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. पारंपरिक उत्सवातील क्षण आधुनिक डिजिटल माध्यमातून मांडण्याचा हा उपक्रम युवकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version