Spread the love

नशिराबाद येथील वार्ताहर धीरज भाई यांच्या विवाह सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

जळगाव : नशिराबाद येथील दैनिक सम्राटचे वार्ताहर आयु. धीरज भाई यांच्या मंगलमय विवाह सोहळ्यास दैनिक सम्राट परिवारातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधू-वरास वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी दैनिक सम्राटचे मुख्य संपादक आदरणीय मुकुंदराव नन्नवरे, जळगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी आयु. जगदीश भाऊ सपकाळे, दैनिक सम्राटचे क्राईम सल्लागार आदरणीय दिनकर दादा अडकमोल तसेच आदरणीय अरुण दादा वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांनी नववधू-वराशी आपुलकीने संवाद साधत त्यांना सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दैनिक सम्राट परिवाराच्या वतीने नवदाम्पत्याच्या भावी आयुष्यासाठी मंगलकामना व्यक्त करण्यात आल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version