Spread the love

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत हर्षल सोनवणे प्रथम

१७ वर्षांखालील ग्रीको-रोमन शैलीतील ६५ किलो वजनी गटात दमदार कामगिरी; आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

धरणगाव | प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत तालुका क्रीडा संकुल, धरणगाव येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत आदर्श माध्यमिक विद्यालय, धरणगावचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी हर्षल दत्तात्रय सोनवणे याने उल्लेखनीय कामगिरी करत १७ वर्षांखालील ग्रीको-रोमन शैलीतील ६५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला.

हर्षलने कुस्तीच्या आखाड्यात आत्मविश्वास, ताकद आणि कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्याच्या या यशामुळे आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एका मानाच्या यशाची भर पडली आहे.

हर्षलच्या या यशामागे क्रीडा शिक्षक फिलिप गावीत यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांनी हर्षलचे अभिनंदन करून त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच संस्थेचे अध्यक्ष सी. के. पाटील, सचिव सुरेखा पाटील, संचालक मच्छिंद्र पाटील, आशिषकुमार पाटील आणि अश्विनकुमार पाटील यांनी हर्षलचे कौतुक करत त्याचे अभिनंदन केले. भविष्यातही त्याने अशीच दमदार कामगिरी करून विद्यालयाचे तसेच धरणगावचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी व्यक्त केल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version