वाढदिवसाचा उत्सव सामाजिक बांधिलकीतून; सचिन काळभोर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
वह्या-पुस्तकांचे वितरण; सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई देत त्यांच्या योगदानाबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
निगडी : भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त निगडी येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना वह्या-पुस्तकांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तर परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई देऊन त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने वह्या-पुस्तकांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून, त्याच भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
याचबरोबर शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना मिठाईचे वाटप करून त्यांच्या श्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शहराच्या स्वच्छतेत सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या कामाची दखल घेणे आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे हा या उपक्रमामागील उद्देश होता.
दरम्यान, सचिन काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेघा कुलकर्णी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अमित गोरखे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश नारायण राणे, खासदार अनुप संजय धोत्रे, महापौर रवी लांडगे आदी मान्यवरांनी लेखी पत्रांद्वारे सचिन काळभोर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच निगडी परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सचिन काळभोर यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये शिवकुमार बायस, राहुल येवले, सुधीर भोसले, पप्पू हतागळे, विकास कांबळे, जयदेव भुवड, सचिन शिंदे, अनिकेत काळभोर, अफसर मुलाणी, राहुल सोनवणे, गणेश बाफना, रवी खैरनार, विशाल उबाळे, प्रवीण पायाळ, प्रसाद फिरोदिया, राजू शेख, रफीक शेख, जावेद शेख, महेबुब शेख, रोहिदास शिवणेकर, संजय बोराडे, सागर बोराडे, जगदीश चौधरी आदींचा समावेश होता.
वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘वाढदिवस साजरा करताना समाजासाठीही काहीतरी देण्याची भावना’ अधोरेखित झाली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देतानाच शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्याने या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
