Spread the love

भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लघुवेतन कर्मचारी संघटनेच्या फलकाचे अनावरण

अधिष्ठाता डॉ. अजित पाठक व वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकरम खान यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

धुळे : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ, मंत्रालय मुंबईच्या फलकाचे अनावरण गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित पाठक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकरम खान, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चौधरी तसेच डॉ. अरुणकुमार नागे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत भदाणे, राज्य सचिव विनोद सोनार, राज्य महिला अध्यक्ष सरलाबाई शिरसाट, राज्य सचिव कांताबाई वर्पे, राज्य ज्येष्ठ सल्लागार वामनराव पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष राहुल वाघ यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमास नंदकिशोर अंबेरे, गोकुळ पाटील, संजू खैरनार, अनिल मराठी, विजय सूर्यवंशी, अक्षय महाले, धीरज चव्हाण, संजय माळी, राधेश्याम देसाई, संघटक भगवान खैरनार, विठ्ठल तिथे, ताराचंद पाटील, सोमनाथ सोनार, कांतीलाल कल्याणी आदींची उपस्थिती होती.

तसेच सुनिता गायकवाड, मीनाबाई गायकवाड, शोभा अंभोरे, संजीवनी उईके, रेखा पवार, अनिता लोहरे, प्राची देशमुख, अविनाश एडके, करवादास सूर्यवंशी, देविदास पाटील, सिद्धार्थ जोंधळे, दुर्गेश लोखंडे, महेंद्र गोयर, बैसाणे, देविदास चावरे यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटनेचा फलक रुग्णालय परिसरात अनावरण करण्यात आल्याने कर्मचारी संघटनेच्या कार्याला अधिक संघटित स्वरूप मिळण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version