Spread the love

माजी नगरसेविका योजना पाटील यांच्या हस्ते शीत शवपेटीचे लोकार्पण

सामाजिक बांधिलकीतून ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत उपक्रम; मान्यवरांकडून कौतुक

भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ

ओझर-अंतुर्ली विकास सोसायटीत भडगाव शेतकरी संघाच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षा तथा माजी सभापती, नगरसेविका योजना पाटील यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची जाणीव जपत शीत शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी शीत शवपेटीची आवश्यकता अनेकदा भासते. विशेषतः दूरवरून नातेवाईक येणे किंवा अंत्यसंस्काराला विलंब होणे अशा परिस्थितीत ही सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरू शकते. या सामाजिक गरजेचा विचार करून योजना पाटील यांनी शीत शवपेटी उपलब्ध करून दिल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.

या लोकार्पणप्रसंगी माजी चेअरमन आनंदराव पाटील, संचालक डी. डी. पाटील, माजी नगरसेवक डॉ. भरत पाटील, मुख्याध्यापक सोमनाथ पाटील, प्रशांत पाटील, अशोकगीर गोसावी, सुनील पाटील, अजबराव पाटील, हेमराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भैय्या पाटील तसेच संस्थेचे सचिव प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी योजना पाटील यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांतून समाजोपयोगी सुविधा उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version