Spread the love

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कपिल अविनाश सोनवणे

उपाध्यक्षपदी अल्ताफ पटेल; १९ सदस्यांची निवड

ममुराबाद : जि. प. केंद्र शाळा, ममुराबाद येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शासनाच्या नियमानुसार व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत झालेल्या या निवड प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कपिल अविनाश सोनवणे, तर उपाध्यक्षपदी अल्ताफ पटेल यांची निवड करण्यात आली.

यावेळी समितीच्या सदस्यपदी अशोक कोळी, अनंत कुंभार यांच्यासह एकूण १९ सदस्यांची निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने पार पडल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सकारात्मक उपक्रम राबविण्याचा निर्धार नवनिर्वाचित समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे, शाळेच्या विकासात पालकांचा सहभाग वाढविणे तसेच शाळा आणि पालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी समिती प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

निवड प्रक्रियेदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक किशोर सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version