Spread the love

बोदवडच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांकाची कामगिरी; बोदवडच्या खेळाडूंचे दमदार यश

बोदवड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच नाशिक विभागीय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२६-२७ मध्ये बोदवडच्या तीन खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर तिन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत पार्थ संदीप माळी (सर सत्यजित नेमाडे हायस्कूल, बोदवड), सोहम गिरधर कोल्हे (एन. एच. रांक हायस्कूल, बोदवड) आणि विवेक भगतसिंग तोरे (जी. जे. राजपूत हायस्कूल, बोदवड) यांनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तिघांनीही दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

प्रशिक्षक व क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन

या यशाबद्दल पॅंथर तायक्वांदो अकॅडमी, बोदवडचे प्रशिक्षक निकेतन भिमराव खोडके व गिरीश भिमराव खोडके, संबंधित शाळांचे क्रीडा शिक्षक तसेच जळगाव जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव अजित घारगे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

तसेच संघ प्रशिक्षक जयेश बाविस्कर, जयेश कासार, पुष्पक महाजन, श्रेयांग खेकारे, दानिश तडवी यांच्यासह खेळाडू व क्रीडाप्रेमींनी तिन्ही खेळाडूंच्या यशाचे कौतुक करत आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

तिन्ही खेळाडूंनी मिळविलेल्या या यशामुळे बोदवडच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version