Spread the love

साकेगाव येथे श्री पंचमुखी हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी साहित्याची मागणी

भाविक व दानशूर नागरिकांनी साहित्य अथवा देणगीच्या स्वरूपात सहकार्य करण्याचे आवाहन

साकेगाव (विशेष वृत्त) : साकेगाव येथे श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे भव्य बांधकाम सुरू असून, मंदिराचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी विविध बांधकाम साहित्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर भाविक, नागरिक तसेच दानशूर व्यक्तींनी साहित्य किंवा देणगीच्या स्वरूपात सढळ हाताने सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर बांधकामाशी संबंधित कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.

मंदिराच्या बांधकामासाठी सध्या पुढील साहित्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे—

  • ८ एमएम लोखंडी सळई — ४ बंडल

  • १० एमएम लोखंडी सळई — २ बंडल

  • १२ एमएम लोखंडी सळई — ८ बंडल

  • १६ एमएम लोखंडी सळई — ५ बंडल

  • बांधकामाची तार — २० किलो

  • खिळे — २० किलो

  • सिमेंट — २०० गोण्या

  • वीट — १० हजार नग

छोटे योगदानही ठरणार मोलाचे

श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक भाविकांनी थेट बांधकामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासोबतच देणगीच्या माध्यमातूनही योगदान देता येणार आहे.

“आपले छोटेसे योगदानदेखील मंदिर उभारणीच्या या धार्मिक कार्यात मोलाची भर घालू शकते,” असे आवाहन करण्यात आले आहे.

मंदिर बांधकामासाठी मदत करू इच्छिणाऱ्या भाविकांनी अधिक माहितीसाठी +९१ ८००७७ ३१२५२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Share.
Leave A Reply

Exit mobile version