दापोरे येथे ‘शिक्षण परिषद’ उत्साहात संपन्न
निपुण महाराष्ट्र अभियान, SQAAF मूल्यांकन व शैक्षणिक गुणवत्तावाढीवर सखोल मंथन
जळगाव ग्रामीण प्रतिनिधी : शैलेश गुरव
दापोरे, दि. ३० सप्टेंबर २०२६ : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दापोरे, ता. जळगाव येथे बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत ‘शिक्षण परिषद (पुष्प २ रे)’ उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन मिळवून देणे तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक विषयांवर परिषदेत सखोल मंथन करण्यात आले.
शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रसमन्वयक माधवी वाघ होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल झोपे (प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था), अजित तडवी (गटशिक्षणाधिकारी, जळगाव), सचिन मगर (शालेय पोषण आहार अधीक्षक वर्ग-२, जळगाव), विजय पवार (प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पाचोरा) तसेच जितेंद्र चिंचोले (शि. वि. अधिकारी, शिरसोली बीट, पंचायत समिती जळगाव) उपस्थित होते.
निपुण महाराष्ट्र व SQAAF मूल्यांकनावर चर्चा
परिषदेत निपुण महाराष्ट्र अभियान, शाळानिहाय प्रगतीचा आढावा, जिल्हास्तरावरून मिळालेल्या सहकार्याच्या आधारे SQAAF विश्लेषण, SQAAF मूल्यांकनात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, आनापान ॲप, त्रैमासिक पालक सभा, पाठ नियोजन तसेच राज्यस्तरीय धोरणात्मक आणि स्थानिक शैक्षणिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कांचन राणे यांनी ‘वीर गाथा’ उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. केंद्रसमन्वयक माधवी वाघ यांनी समग्र प्रगती पत्रकाचा आढावा घेतला. तसेच शिक्षण परिषदेची लिंक भरण्याबाबत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विचारमंथन
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक, अध्यक्ष निवड, ईशस्तवन आणि प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, विविध शैक्षणिक उपक्रम, शाळेची गुणवत्ता, मूल्यमापन प्रक्रिया आणि आगामी शैक्षणिक नियोजन या विषयांवर उपस्थित शिक्षकांनी विचारमंथन केले.
मुख्याध्यापक गोपीचंद दादाजी भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण परिषद यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि संबंधितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शालेय पोषण आहाराचे सकाळी वाटप करून शिक्षक व संबंधितांनी शिक्षण परिषदेस उपस्थिती लावली. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी मिळालेले मार्गदर्शन तसेच विविध विषयांवरील चर्चेमुळे परिषद फलदायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
जि. प. उच्च प्राथमिक शाळा दापोरे आणि केंद्रसमन्वयक, शिरसोली यांच्या संयुक्त आयोजनातून ही शिक्षण परिषद उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली.
