Spread the love

मनोहर भदाणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

संस्कार मतिमंद मुलींच्या शाळेत अन्नदान; दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन

धुळे :
भाजप नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर भदाणे यांचा वाढदिवस यंदा सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त मोराणे येथील श्री संस्कार मतिमंद मुलींच्या शाळेत अन्नदान करण्यात आले. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त केले.

सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त फ्लेक्स, पुष्पगुच्छ किंवा अनावश्यक खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवावा, असे आवाहन मनोहर भदाणे यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सोनगीर येथील भाजप पदाधिकारी, आमदार राम भदाणे मित्रपरिवार तसेच किशोर पावनकर आणि अमित बागुल यांच्या सहकार्याने हा अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला.

श्री संस्कार मतिमंद मुलींच्या शाळेत विशेष मुलींच्या शिक्षणासोबत विविध कौशल्यविकासाचे उपक्रमही राबविले जातात. या संस्थेची नोंद महाराष्ट्राच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अधिकृत यादीत आहे.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

या उपक्रमावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आर. के. माळी, प्रभारी सरपंच लखन ठेलारी, अमित बागुल, किशोर पावनकर, राजेंद्र महाजन, रविराज माळी, पराग देशमुख, भटू धनगर, अनिल माळी, विनोद खलाने, जितेंद्र बागुल यांच्यासह संस्कार मतिमंद मुलींच्या शाळेचे सुनील वाघ, संदीप माळी, संदीप गुजर, प्रसाद जैन, भूषण बडगुजर, दीपक माळी, सोमनाथ माळी, समीर पिंजारी, राहुल मोरे, अंकुश माळी, साई खैरनार, विजय सोनवणे, राजू नगराळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version