प्रल्हादनगर भुसावळ येथे भव्य महिला धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेतर्फे १० दिवसीय शिबिर; धम्ममय वातावरणात उद्घाटन सोहळा संपन्न
भुसावळ प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा, जळगाव जिल्हा पूर्व अंतर्गत भुसावळ महिला शाखेच्या वतीने प्रल्हादनगर येथे आयोजित १० दिवसीय महिला धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन सोहळा १ ऑक्टोबर २०२६ रोजी धम्ममय वातावरणात उत्साहात पार पडला. जळगाव जिल्हा पदाधिकारी, शहर शाखेचे महिला व पुरुष पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धूप-दीप प्रज्वलित करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व महिला विभागाच्या अध्यक्षा प्रियंका ताई अहिरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा भुसावळ शहर अध्यक्षा प्रतिभाताई सोनवणे होत्या.
उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य संघटक लताताई तायडे, जळगाव जिल्हाध्यक्ष सुमंगल अहिरे गुरुजी आणि महिला विभागाच्या सरचिटणीस वैशालीताई सरदार यांनी शिबिरार्थी धम्म उपासिकांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग सुमित्राताई सर्वटकर, शिबिराच्या मार्गदर्शक रमेश सावळे गुरुजी (जळगाव जिल्हा लेफ्टनंट कर्नल, समता सैनिक दल), जिल्हा संघटक प्रकाश सरदार गुरुजी, समता सैनिक दलाच्या वनिताताई सावळे यांच्यासह जळगाव जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होती.
नागसेन कॉलनी, भुसावळ शहर कार्यकारिणीतर्फे सीमाताई अहिरे (उपाध्यक्ष, संस्कार विभाग), सुनंदा निकम (शहर उपाध्यक्ष, प्रचार व पर्यटन), कमलाताई निकम (उपाध्यक्ष, समता सैनिक दल), विद्याताई तायडे (सचिव, संरक्षण), सुरेखा घोडेस्वार (संघटक), सारिका शिरसाट, प्रभावती कांबळे, छायाताई रोकडे, प्रमिलाताई मस्के, सुनंदाताई सपकाळे आणि छायाताई भोसले यांच्यासह भुसावळ महिला कार्यकारिणीच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखाताई गायकवाड यांनी केले. उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, शिबिरार्थी महिला आणि समाजबांधवांच्या सहभागामुळे उद्घाटन सोहळा अत्यंत मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
