Spread the love

शासकीय ITI पाचोरा येथील चेतना हिरेचे वक्तृत्व स्पर्धेत यश

‘वाचाल तर समृद्ध व्हाल’ विषयावर प्रभावी वक्तृत्व; आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक

भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ

पाचोरा : शेठ नारायण बंकट वाचनालय, चाळीसगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्व. प्रा. सौ. मंदाताई व स्व. डॉ. शामकांत वा. स्मृती करंडक आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पाचोरा येथील COPA ट्रेडची विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे हिने उल्लेखनीय यश संपादन केले.

कु. चेतना हिने ‘वाचाल तर समृद्ध व्हाल’ या विषयावर प्रभावी वक्तृत्व सादर करत स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. आपल्या सादरीकरणातून वाचनाचे महत्त्व, ज्ञानवृद्धी आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत तिने प्रभावी विचार मांडले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे DYSP विजय ठाकूरवाड यांच्या उपस्थितीत कु. चेतना हिरे हिचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

तिच्या या यशाबद्दल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाचोरा यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच संस्थेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तिचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version