पहाण गावात दुष्काळी पंचनामे शांततेत
तलाठी-ग्रामसेवकांनी बांधावर जाऊन जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या; लवकरच मदत मिळण्याचे आश्वासन
पहाण : महाराष्ट्रातील विविध भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पहाण गावात दुष्काळी पंचनाम्याची प्रक्रिया शांततेत पार पडली. गावातील शेतकऱ्यांनी पंचनाम्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक सहकार्य केल्याने कामकाज सुरळीतपणे पूर्ण करण्यात आले.
पहाण गावातील तलाठी व ग्रामसेवक नंदकिशोर पाटील यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची स्थिती, शेतीसमोरील अडचणी तसेच दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेण्यात आली.
शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेतल्यानंतर शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल तसेच लवकरच मदत व निधी उपलब्ध होण्याबाबत आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांचे पंचनाम्यासाठी सहकार्य
दुष्काळी पंचनाम्याच्या प्रक्रियेत विलास चुडामण पाटील, आबाजी गोबा पाटील, देविदास हरिदास पाटील, विलास जगन्नाथ पाटील, मगन जयराम पाटील, नारायण काशिनाथ पाटील, पुरुषोत्तम तुकाराम, पवन विलास, राधेश्याम अभिमन, गुरुदास शंकर, रितेश युवराज, राधेश्याम अभिमान, हेमंत प्रभूलाल, मिलिंद पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सहकार्य केले.
पंचनाम्याच्या वेळी पहाण गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. प्रशासनाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा असून, पंचनाम्याच्या आधारे पुढील मदत व उपाययोजना लवकरात लवकर करण्यात याव्यात, अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली
