Spread the love

धरणगावच्या नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व नगरसेविका ज्योती पाटील यांना समाजभूषण पुरस्कार

जळगाव येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, समाजभूषण, कृषिरत्न व कृषीगौरव पुरस्कार सोहळ्यात गौरव

धरणगाव प्रतिनिधी : धरणगाव शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लिलाताई सुरेश चौधरी तसेच प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका ज्योती लक्ष्मण पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने जळगाव येथील पोलीस मल्टीपर्पज हॉलमध्ये रविवारी (दि. ४) राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, समाजभूषण, कृषिरत्न व कृषीगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रासह शिक्षण, कृषी आणि समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यात आली. गरिबी, अत्याचार, शोषण, मानवाधिकारांचे उल्लंघन तसेच पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती आणि पीडितांना मदत करण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

याच कार्यक्रमात धरणगावच्या नगराध्यक्षा लिलाताई सुरेश चौधरी आणि नगरसेविका ज्योती लक्ष्मण पाटील यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे फाउंडर व प्रेसिडेंट अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी संस्थेचे स्टेट प्रेसिडेंट महाराष्ट्र प्रफुल्ल सीताराम पाटील, महिला प्रदेश अध्यक्ष प्रा. मंदाकिनी नवल भामरे, महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष प्रमोदिनी पाटील, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ईश्वर पाटील, महाराष्ट्र राज्य महिला कार्याध्यक्ष गायत्री सी. पाटील, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अर्चना गंभीरराव वाघ, जळगाव तालुकाध्यक्ष भूपेंद्र पुरुषोत्तम बेंडाळे, जळगाव जिल्हाध्यक्ष आर. ए. पाटील, जळगाव शहर महिला अध्यक्ष योगिता रतिलाल पाटील, बुलढाणा जिल्हाध्यक्ष मंदिर हुटेकर, बुलढाणा महिला जिल्हाध्यक्ष रुपाली गायकवाड, बुलढाणा जिल्हा महिला कार्याध्यक्ष सुनीता बाहेकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुरस्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version