Spread the love

येवती ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; सहा सदस्यांचा जाहीर पक्षप्रवेश

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला आणखी एक बळ मिळाले असून, बोदवड तालुक्यातील येवती ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वावर तसेच मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रा. हितेश दादा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत या सदस्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांना आणि संघटनात्मक उपक्रमांना प्रतिसाद देत हा पक्षप्रवेश झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे येवती परिसरात शिवसेनेच्या स्थानिक संघटनेला बळ मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सदस्यांमध्ये शुभम गणेश पाटील, सौ. कविता सागर शेजोळे, शमीनाबी शेख अशपाक, फारुख नूर खान, सौ. केसरबाई शिवदास भिल आणि सौ. संगम दीपक म्हसाने यांचा समावेश आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध स्तरांतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेनेशी जोडले जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. प्रा. हितेश पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळेही संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

या पक्षप्रवेशावेळी येवती ग्रामपंचायत उपसरपंच दिनेश माळी, ग्रामपंचायत सदस्य गणेश सोनवणे, आशिष सोनवणे, डॉ. आनंद माळी, शेख अशपाक शेख हाफिस, मधूभाऊ शेजोळे यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई, जिल्हासंघटक सुनीलभाऊ पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पंकजभाऊ राणे, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अफसरभाई खान, राजेंद्रभाऊ वानखेडे, नगराध्यक्ष दिनेश माळी, नगरसेवक सईद दादा बागवान, निलेश माळी, सुनील बोरसे, जफर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व सदस्यांचे स्वागत करून त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version