धुळे – मुख्य निवडणूक आयुक्त विरोधात मनसे आक्रमक झाला असून एक सही संतापाची मोहीम राबवत निवडणूक आयुक्तांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली आहे. जुन्या मनपा चौकात राबविलेल्या मनसेच्या या सहींच्या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अन माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या सूचनेनुसार मनसेचे महानगर अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली आहे.
एस आय आर मोहिमेच्या माध्यमातून मतचोरीला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी खतपाणी घातल्याचा आरोप मनसेने केला आहे. स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडून पारदर्शक कारभार होत नसल्याचा संशय मनसेने व्यक्त केला आहे त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक झाला असून एक सही संतापाची ही मोहीम मनसेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.यावेळी मनसेचे महानगराध्यक्ष संजय सोनवणे, राजेंद्र खैरनार, यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
