धुळे – वाडी गावात उपसरपंचांसह शासकीय कर्मचारी असणाऱ्या गावगुंडांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून गावातील ग्रामस्थांना मारहाण करण्यासह इतर त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अशा गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी वाडी येथील ग्रामस्थांनी एस पी कडे धाव घेतली आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास 2 नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गणपती विसर्जनाच्या गाण्यावरून दोन गटांमध्ये शिरपूर तालुक्यातील वाडि या गावात वाद झाला होता. या वादामध्ये गावाचे उपसरपंच राजदर धनगर, विशाल राजदर धनगर, विनोद राजधर धनगर यांच्यासह इतरांनी एकाला लाट्या काट्या, लोखंडी रॉड अन तलवारीने मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेलो असता पोलिसांनी तक्रार न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित गावगुंडांवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी एसपींकडे धाव घेतली आहे.
यावेळी सुनील केले, नारायण कोळी, सुदाम तिरमले, विलास कोळी, सतीश कोळी, जगदीश तिरमले, विठ्ठल कोळी, तुकाराम तिरमले, नारायण कोळी, रजूबाई तिरमले, संगीता कोळी, भारती तिरमले, सुरेखा तिरमले, सुनिता तिरमले, कल्पना कोळी, यांच्यासह असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
