छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगावात सामाजिक उपक्रम!
ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे-बिस्किटांचे वाटप; हिरेनगरमध्ये केक कापून वाढदिवस साजरा
नांदगाव, दि. १५ ऑक्टोबर | दीपक अंभोरे, दै. जनसम्राट टाईम्स
महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ आणि नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सकाळी ११ वाजता हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रुग्णांना फळे व बिस्किटे देण्यात आली. तसेच उपस्थितांनी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
हिरेनगरमध्ये केक कापून वाढदिवसाचा उत्साह
ग्रामीण रुग्णालयातील उपक्रमानंतर मनमाड रोडवरील हिरेनगर येथे केक कापून छगन भुजबळ व समीर भुजबळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना केली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला नांदगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रतिनिधींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वांनी एकत्र येत वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त केल्या.
सामाजिक उपक्रमांतून वाढदिवस साजरा करण्याच्या या प्रयत्नाची परिसरात चर्चा होत असून, रुग्णांना दिलासा देणाऱ्या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
