Spread the love

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजाद समाज पार्टी (का.)चे केडर कॅम्प उत्साहात संपन्न

महापुरुषांचे विचार आणि बहुजन चळवळीचा इतिहास यावर मार्गदर्शन; ‘संघर्षातून सत्तेकडे’ सामाजिक परिवर्तनाचा संकल्प

सोयगाव प्रतिनिधी – शिवराम जाधव

छत्रपती संभाजीनगर, दि. १८ ऑक्टोबर २०२६ : आजाद समाज पार्टी (कांशीराम), छत्रपती संभाजीनगर जिल्हा युनिटच्या वतीने १८ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे (केडर कॅम्प) आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

अरविंद कांबळे यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी मा. अरविंद कांबळे साहेब यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार ॲड. भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली महापुरुषांचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे काम करावे, याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

बहुजन चळवळीचा इतिहास आणि संघटनात्मक बांधणीवर भर

या वेळी संघटनेची विचारधारा, बहुजन चळवळीचा इतिहास, सामाजिक परिवर्तनाचे महत्त्व आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करून बहुजन समाजाला संघटित करणे आणि समाजाला सत्ताधारी जमात बनविण्याच्या दिशेने संघटनात्मक बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन अरविंद कांबळे यांनी केले.

विजय शिनगारे यांच्या पुढाकारातून आयोजन

या केडर कॅम्पचे आयोजन आजाद समाज पार्टी (कांशीराम), छत्रपती संभाजीनगर जिल्हा युनिटचे जिल्हाध्यक्ष विजय देवराव शिनगारे यांनी केले होते.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

या प्रशिक्षण शिबिराला प्रदेश सचिव काशिनाथ भांडेगावकर, मराठवाडा कार्याध्यक्ष तातेराव ससाने, जिल्हा प्रभारी राहुल साबळे, युवा जिल्हाध्यक्ष अनामी मोरे, शहराध्यक्ष शेख जावेद, कामगार जिल्हाध्यक्ष फिरोज खान, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेख जुबेर, दिव्यांग जिल्हाध्यक्ष शेख मुनीर, महिला शहराध्यक्ष रेखाताई राजभोज, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शेख आझर, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव दाभाडे आणि राजू गवारगुरु उपस्थित होते.

तसेच पूर्व विधानसभा अध्यक्ष राहुल जाधव, युवा जिल्हा महासचिव नितीन वाहुळ, युवा जिल्हा सचिव दीपक सरवदे आणि सागर अंभोरे, मध्य विधानसभा प्रभारी अरुण पगारे, पूर्व विधानसभा अध्यक्ष शेख समीर, गंगापूर तालुका अध्यक्ष निलेश गजभार, तालुका उपाध्यक्ष रवी निकम, सिल्लोड तालुका उपाध्यक्ष राजू घोरपडे, सिल्लोड युवा तालुका अध्यक्ष स्वप्निल बिरारे, कन्नड तालुका उपाध्यक्ष किसन जाधव आणि तालुका सचिव संजय धनेधर यांच्यासह विविध आघाड्यांचे प्रमुख, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघर्षातून सत्तेकडे; सामाजिक परिवर्तनाचा संकल्प

या केडर कॅम्पच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, बहुजन समाजात जागृती निर्माण करणे आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

घोषवाक्य : संघर्षातून सत्तेकडे — बहुजन समाजाचे मिशन, सामाजिक परिवर्तनाचा संकल्प!

Share.
Leave A Reply

Exit mobile version