Spread the love

अमळनेरमध्ये मराठा समाज महिला मंडळाचा गरबा-दांडिया जल्लोषात!

नवरात्रोत्सवानिमित्त स्पर्धांचे आयोजन; महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने मंगल कार्यालयात रंगली आनंदाची पर्वणी

अमळनेर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून मराठा समाज महिला मंडळ, अमळनेर यांच्या वतीने १७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात गरबा-दांडिया स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध दांडिया आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला जल्लोषपूर्ण वातावरण लाभले. आनंद, उत्साह, मैत्री आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम या स्पर्धेत पाहायला मिळाला.

मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. तिलोत्तमाताई पाटील आणि अध्यक्षा सौ. सुलोचनाताई वाघ यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यकारिणी संचालक जयश्रीताई पाटील, लीनाताई पाटील, प्रभाताई पवार, माधुरीताई पाटील, स्वप्नाताई पाटील, रूपालीताई पाटील, नलिनीताई पाटील, दीपिकाताई शिंदे, पद्मजाताई पाटील, गायत्रीताई भदाणे, सुनीताताई पाटील, राजश्रीताई पाटील आणि सविताताई अहिरे यांची उपस्थिती होती.

गरबा-दांडियातून मैत्रीचे बंध अधिक घट्ट

या स्पर्धेच्या माध्यमातून विविध वयोगटांतील महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. गरबा-दांडियाच्या तालावर महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. एकमेकींच्या सहवासातून ऊर्जा, आनंद आणि मैत्रीचे नवे बंध निर्माण झाले.

मराठा समाज महिला मंडळ म्हणजे केवळ एकत्र येण्याचे व्यासपीठ नसून महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे, त्यांना आनंदाने जगण्याची प्रेरणा देणारे आणि सांस्कृतिक परंपरा जपणारे कुटुंब असल्याची भावना या कार्यक्रमातून व्यक्त झाली.

स्पर्धेतील विजेत्यांची नावे

जोडी स्पर्धा — राधा-कृष्ण, राधा-राधा गट

  • प्रथम क्रमांक : रश्मिका पाटील आणि आरुषी पाटील

  • द्वितीय क्रमांक : याश्वी पाटील आणि कस्तुरी पाटील

  • तृतीय क्रमांक : आशा पाटील आणि शीतल पाटील

एकल स्पर्धा (सोलो) — वयोगट १२ ते २० वर्षे

  • प्रथम क्रमांक : राखी पाटील

  • द्वितीय क्रमांक : रश्मिका पाटील

  • तृतीय क्रमांक : कस्तुरी पाटील

  • उत्तेजनार्थ : आरुषी पाटील

एकल स्पर्धा (सोलो) — वयोगट २१ ते ४५ वर्षे

  • प्रथम क्रमांक : महिमा पाटील

  • द्वितीय क्रमांक : राजश्री पाटील

  • तृतीय क्रमांक : कविता पाटील

  • उत्तेजनार्थ : सारिका पाटील

  • उत्तेजनार्थ : सुरेखा खैरनार

उत्कृष्ट व परिपूर्ण केशभूषा आणि वेशभूषा

  • प्रथम क्रमांक : सुलोचना बोरसे

  • द्वितीय क्रमांक : कोमल भदाणे

  • उत्तेजनार्थ : ज्योती पाटील

सर्व विजेत्या स्पर्धकांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर मंडळाच्या उपक्रमाची शोभा वाढविली. स्पर्धकांचा उत्साह आणि त्यांचा सहभाग कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

परीक्षक, सूत्रसंचालन आणि आभार

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रीती शहा आणि गार्गी गोहिल यांनी काम पाहिले. बहारदार आणि प्रभावी सूत्रसंचालन सविताताई अहिरे व प्रभाताई पवार यांनी केले. सविताताई अहिरे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा समाज महिला मंडळाच्या सर्व कार्यकारिणी सदस्य आणि महिला सभासदांचे सहकार्य लाभले. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा आणि आनंदासोबतच मैत्रीचे बंध दृढ करणारा हा गरबा-दांडिया सोहळा उत्साहात पार पडला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version