मोटरगा येथील ज्येष्ठ नागरिक शेषेराव जोंधळे यांचे निधन
वयाच्या ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार, उपस्थितांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
मुखेड | प्रतिनिधी
मोटरगा येथील ज्येष्ठ नागरिक शेषेराव मालू जोंधळे यांचे सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता मोटरगा येथील स्मशानभूमीत बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंचशील आणि शरणत्तेय गाथेचे पठण
अंत्यसंस्काराच्या वेळी पंचशील आणि शरणत्तेय गाथेचे पठण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी एक मिनिट मौन पाळून दिवंगत शेषेराव जोंधळे यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी ‘शेषेराव जोंधळे अमर रहे’ अशा घोषणा देत उपस्थितांनी त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला.
मोठा परिवार शोकसागरात
दिवंगत शेषेराव जोंधळे यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, एक जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते काशिनाथ जोंधळे आणि विश्वनाथ जोंधळे यांचे वडील होत.
त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यांच्या निधनाने जोंधळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
