Spread the love

‘नारायण इलेक्ट्रिक अँड स्टील होम’ला सदिच्छा भेट; प्रा. मन्मथ देशमुख यांना शुभेच्छा!

सामाजिक व शैक्षणिक चळवळीतील सहकाऱ्यांची उपस्थिती; नवीन व्यावसायिक उपक्रमाचे केले कौतुक

कंधार प्रतिनिधी | एस. एन. नांदेडकर

कंधार : तालुक्यातील कौठा येथील ‘नारायण इलेक्ट्रिक अँड स्टील होम’ या व्यावसायिक आस्थापनाला सामाजिक व शैक्षणिक चळवळीतील सहकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी आस्थापनाचे मालक प्रा. मन्मथ देशमुख यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत नवीन व्यावसायिक उपक्रमासाठी आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

या सदिच्छा भेटीदरम्यान सामाजिक व शैक्षणिक चळवळीतील सक्रिय सहकारी इंजि. जयपाल शिरसाठे, विद्यार्थी नेते विजय लोहबंदे तसेच नव्याने प्राचार्यपदी निवड झालेले संघशिल भद्रे ऊर्फ एस. एन. नांदेडकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितांनी प्रा. मन्मथ देशमुख यांच्या व्यावसायिक उपक्रमाचे कौतुक केले. व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती साधताना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. देशमुख यांनी भविष्यातही यशाची नवी शिखरे गाठावीत, अशा सदिच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.

या भेटीमुळे सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील सहकाऱ्यांमधील स्नेहपूर्ण संबंध अधोरेखित झाले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version